Thursday, 13 February 2014

Will Marathi be without comma?

The following is the response from Ganesh Puranik to the post  

http://mediasceneindia.blogspot.in/2014/02/comma-may-be-abolished-from-english.html 


धन्यवाद सर, एक महत्त्वाची माहिती 'share' केल्याबद्दल !

खरं 
तर मुळात भारतीय भाषांमध्ये रूढ अर्थाने विराम चिन्हे नव्हती'गद्य' साहित्य तात्त्विक दृष्ट्या 'पद्य' साहित्यापेक्षा श्रेष्ठ मानले जायचे, पण 'पद्य' हे अर्थातच लोकप्रिय होते ! पद्याचे संख्यात्मक प्रमाण अधिक असल्यामुळे बहुदा असेल, पण 'एकल दंड' (
। ) आणि 'द्वि दंड' ( ॥ ) या पलीकडे विराम चिन्हांचा विचार भारतीय भाषांमध्ये झाला असेल, असे वाटत नाही.   

नागपूरला कवि कालिदास संस्कृत विद्यापिठात 'भाषा शास्त्रशिकतअसताना, एका व्याख्यानादरम्यान आम्हाला सांगण्यात आले होते कि,
'वेदोक्त संस्कृत' मध्ये किंवा 'संस्कृत' मध्ये शब्द आधारित, जोडाक्षरे आधारित 
'विराम स्थळे(विराम चिन्हांचा 'प्रगत' अथवा 'अप्रगत' प्रकार)होती. (अर्थात पाश्चिमात्यांकडे जे आज आहे, ते आमच्याकडे त्यांच्यापेक्षा आधीपासूनच आहे, असे सांगण्याचा अभिनिवेश पण त्या व्याख्यानातहोताच !) 
एकोणिसाव्या शतकात मेजर थॉमस कॅंडी ने मराठी भाषेत विरामचिन्हे रुजवली.  भारतीय भाषांमध्ये सर्वप्रथम आणि सर्वाधिक विरामचिन्हेमराठी भाषेमध्ये आली, रुजली आणि वाढलीअसे मानले जाते.  मराठी भाषेत आज सहजपणे वापरले जाणारे रोमन लिपी आधारित  'पूर्ण विराम' (.) यासारखे विराम चिन्ह अजूनही हिंदी भाषेत पूर्णांशाने रुजलेले नाहीहे इथे आवर्जून करावेसे वाटते.
असो, सदर बातमीमध्ये लिहिल्याप्रमाणे जर खरोखरच स्वल्पविरामाला अलविदा केलेतर सगळ्यात आधी गोची होईलती आपल्या वकील लोकांची !  'अर्धविराम' (;), स्वल्पविराम (,) यासारख्या विरामचिन्हांचा सर्वाधिक वापर होत असावा तो कायदेशीर भाषे, विरामचिन्हे जर काढूनटाकली, तर एका कलमाचे अनेक कलमी अर्थ लावणा-या आमच्या वकिलांचे कसे होणार? (खर तर अनेकांचे जरा जास्तीच 'भले' होणार ;-) )
शाळेत स्वल्पविराम किंवा विरामचिन्हे यांचे महत्त्व सांगताना "डोईवर जांभळे पागोटे खांद्यावर उपरणे पायात जोडा हातात छत्री खिशात केसरी अशा वेशात टिळक गायकवाड वाड्यात आले" यासारखीअर्थाचा अनर्थ करणारी अनेक वाक्ये वानगीदाखल सांगितली जायची.सारांश, विरामचिन्हे नसतील तर अनेक ठिकाणी अर्थाचा अनर्थ होऊ शकतो
तळटीप: अधिक प्रभावी 'शब्दानुशासन' (हा व्याकरणकार 'पतंजली' चा आवडता शब्द) असावे यासाठी आपल्याकडे विरामचिन्हे आली ती पश्चिमेकडून आणि आता तेच लोक विरामचिन्हांना अलविदा करण्याचा विचार करतायत …. एक circle पूर्ण झाले म्हणायचे !  :-) 

आपलाच
गणेश

No comments: