“पॉडकास्टिंग हे एक असे माध्यम आहे ज्यात तुम्ही लोकानुनयाचा विचार न करता आपल्या आवडीचा विषय घेऊन त्याबद्दलचे पॉडकास्ट करू शकता आणि घवघवीत यश संपादन करू शकता.
ते कसं करू शकता, त्यासाठी काय तयारी हवी, कोणती उपकरणं गरजेची आहेत या सगळ्याची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतील, या पुस्तकाची मला सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे ते अतिशय सोप्या आणि रंजक पद्धतीने लिहिले आहे. भाषा सोपी वापरली की आपोआपच 'हे मला जमेल' असा आत्मविश्वास वाटतो. काही अतिशय व्यावहारिक सूचनाही या पुस्तकात दिलेल्या आहेत. हे माध्यम समजलं आहे. अशा अनुभवी लेखकांनी हे पुस्तक लिहिलं आहे, ही या पुस्तकाची आणखी जमेची बाजू आहे. उज्बला बर्वे आणि नचिकेत क्षिरे या दोघांनी 'माध्यम संशोधन संवाद आणि 'इन्स्पिरेशन कट्टा' सारख्या यशस्वी पॉडकास्टची निर्मिती केली आहे.”
कौशल इनामदार
No comments:
Post a Comment