Saturday, 31 December 2011

DoCJ Mumbai initiates 'Marathi Novel Writing Month' Movement


The global  ‘National Novel Writing Month’ movement that lured millions of lay persons  to attempt to write fiction has now been launched in Marathi also.

The movement in Marathi has been initiated by the department of Communication and Journalism, University of Mumbai.  

The idea is that you have to begin writing a novel on January 01, 2012 and complete it by March 31, 2012. 

Click here www.jamlekhan.org for details.


जाम लेखन उत्सव म्हणजे?
Nanowrimo म्हणजे National Novel Writing Month. तीस दिवसात पन्नास शब्दांची कादंबरी लिहिण्याचा हा एक भन्नाट वार्षिक प्रकल्प आहे. आयुष्यात निदान एकदातरी कादंबरी लिहायची आहेअसं वाटणार्या जगातील असंख्य लोकांसाठी हा प्रकल्प ख्रिस बेटी या मुक्त लेखकाने जुलै 1999 साली सॅन फ्रांसिस्को बे या अमेरिकेतील शहरात सुरू केला. पहिल्या वर्षी 21 लोकांनी यात भाग घेतला होता. 2000 साली वाईट हवामानाचा फायदा मिळावा’(जोरात हिमवर्षाव झाल्यावर घरी अडकल्यावर काय करावं?) म्हणून हा प्रकल्प नोव्हेंबर महिन्यामध्ये करावा असे ठरले. त्यावर्षी 140 लोकांनी या प्रकल्पात भाग घेतला. इंटरनेट, सोशल नेटवर्किंग साइट्स, वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी या सगळ्यांनी या प्रकल्पाला इतके उचलून धरले की हा राष्ट्रीय प्रकल्प बघता बघता आंतरराष्ट्रीय झाला. यामध्ये सहभागी होणार्यां ची संख्या  इतकी वाढली की यासाठी निर्माण केलेले संकेतस्थळ गडबडले. 2010 साली दोन लाख लोकांनी यात भाग घेतला आणि 2,87,26,82,109 शब्द लिहिले. यावर्षी हा आकडा 3,07,31,76,540वर जाऊन पोचलाय. आहे की नाही भारी?

जामलेखन
2012
जागतिक मराठी लेखन उत्सव अर्थात जामलेखन उत्सव हा मराठीतून लेखनाभिव्यक्ति करू इच्छिणार्‍या जगातल्या प्रत्येकाचा उत्सव आहे. ताई, माई, अक्का, दादा, अण्णा, आप्पा, विन्या, पम्या, विनी, सोनाली अशा घरातल्या मोठ्यातल्या मोठ्या आणि लहानातल्या लहान लिहिणार्‍या व्यक्तीसाठी हा उत्सव आहे. आपल्या मनातली गोष्ट सांगून पाहावी एकदा असं वाटणार्‍या प्रत्येक व्यक्तीसाठी हा उत्सव आहे.
आठवतात का त्या कथा, कादंबर्‍या, ती नाटकं, चित्रपट, इतिहासातल्या त्या घटना आणि पात्रं ज्यांनी आपल्याला भारावून सोडलं? आठवतात त्या लेखकांशी झालेल्या भेटी आणि त्या सगळ्यातून ती जबर्दस्त उफाळून आलेली लिहायची इच्छा? आठवताहेत त्या टीव्हीवरच्या, रेडिओवरच्या लेखकांच्या, प्रकाशकांच्या मुलाखती? त्यातून झालेली ती इच्छा की आपणही काहीतरी लिहिलं पाहिजे? आठवताहेत त्या स्पर्धा शाळेतल्या, कॉलेजातल्या? आठवतात का ते दिवस जेव्हा आपण कामात आणि कुटुंबात व्यस्त होतो आणि राहून गेलं लिहायचं? ती संमेलनं, चर्चासत्रं, गप्पाटप्पा नदीकाठी जेव्हा मित्रांनी पाठीवर थाप देत सांगितलं होतं 'लिही गड्या एकदा हे सगळं'? आठवते ती मैत्रिणींमध्ये आपण म्हणून दाखवलेली छोटीशी कविता? गणपती उत्सवात केलेलं नाटक, कॉलेजातल्या गॅदरिंगसाठी लिहिलेली एकांकिका? आपल्या आयुष्याला वळण देणारी ती माणसं, आपल्याला आह्वान देणारी माणसं, आपल्याला हरवणारी, आपल्यासमोर हरणारी ती सगळी माणसं, ती परिस्थिती, आपल्याला पडलेले प्रश्न, काही अजूनही अनुत्तरित तर काहींची आपल्याला सापडलेली उत्तरं या सगळ्याची करा नोंद, मांडा आपल्या आयुष्यावरचे आपले उपनिषद जगापुढे यावर्षीच्या जामलेखन उत्सवात.
कागदावर पेन गिरवा किंवा की-बोर्डवर बोटं आपटा....तुमच्यात असणा-या सृजनतेला मोकळं करा. डोक्यातल्या विचारांना शब्दांच्या माध्यमातून बाहेर काढा. खच्चून लिहा, अक्षरांच्या राशी रचा, विचारांनी पानंच्या पानं भरा, भावनांना शाईची वाट करून द्या, अलंकारांशी खेळा, स्वरव्यंजनांच्या माळा गुंफा, जामलेखन करा.
पन्नास हजार शब्दांची कादंबरी, चित्रपट पटकथा, नाटक, आत्मकथन, जीवनचरित्र नव्वद दिवसात लिहा. 1 जानेवारी ते 30 मार्च, 2012 (31 मार्च तारीख ठेवली तर एक्याणण्णव दिवस होतात ना???? म्हणून), या नव्वद दिवसांत पन्नास हजार शब्दांचे वर उल्लेखिलेले काहीही लिहा आणि व्हा यावर्षीचे जामलेखक.
थोडासा भागाकार वगैरे केलात तर दररोज लिहायचे आहेत केवळ 555 शब्द. बस्स्स! अगदी सोप्पं आणि सहज शक्य आहे. मग वाट कसली पाहताय? येऊ द्या बाहेर मनातील ती पात्रे, त्या घटना, ते संघर्ष, ते वादविवाद, ती स्वप्नं, ती मजा, ती मौज, ती सुखदु:खं, ते सगळे आठ रस (की नऊ, की बारा...की.....) आणि चार भाव. अवतरू दे शब्दांत तुमच्या मनातले जग. करा धमाल, खेळा शब्दांशी, अलंकारांशी, स्वरांशी, व्यंजनांशी. करू देत त्यांना धमाल तुमच्या मेंदूत आणि बाहेर पडू देत एक मस्त कलाकृती. एकदा पहा बनून विश्वकर्मा.
अलिबाबाची ही गुहा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 1 जानेवारी रोजी 00.00 वाजता उघडेल आणि 30 मार्चला 23.59 नंतर त्वरित बंद होईल. मग 1 तारखेला तयार व्हा 'खुल जा सिमसिम' म्हणायला आणि उतरा या अभूतपूर्व लेखनोत्सवात.
For those who could not understand the approach explained above, here is what the original NaNoWriMo explains the concept at http://www.nanowrimo.org/en/ywp

“The is a fun, seat-of-your-pants approach to novel writing. Participants begin writing on November 1. The goal is to write a 50,000 word, (approximately 175 page) novel by 11:59:59, November 30.
Valuing enthusiasm and perseverance over painstaking craft, NaNoWriMo is a novel-writing program for everyone who has thought fleetingly about writing a novel but has been scared away by the time and effort involved.
Because of the limited writing window, the ONLY thing that matters in NaNoWriMo is output. It’s all about quantity, not quality. This approach forces you to lower your expectations, take risks, and write on the fly.
Make no mistake: You will be writing a lot of crap. And that’s a good thing. By forcing yourself to write so intensely, you are giving yourself permission to make mistakes. To forgo the endless tweaking and editing and just create. To build without tearing down.
As you spend November writing, you can draw comfort from the fact that, all around the world, other National Novel Writing Month participants are going through the same joys and sorrows of producing the Great Frantic Novel. Wrimos meet throughout the month to offer encouragement, commiseration, and—when the thing is done—the kind of raucous celebrations that tend to frighten animals and small children.
In 2010, we had over 200,000 participants. More than 30,000 of them crossed the 50K finish line by the midnight deadline, entering into the annals of NaNoWriMo superstardom forever. They started the month as auto mechanics, out-of-work actors, and middle school English teachers. They walked away novelists.”
--
No comments: