Tuesday, 6 February 2018

प्रा. सुजाता शेणई यांना श्रीमती ना. दा. ठाकरसी विद्यापीठाक़डून पीएच.डी.
पुणे – प्रा. सुजाता शेणई यांना श्रीमती ना. दा. ठाकरसी विद्यापीठाक़डून नुकतीच पीएच.डी. प्राप्त झाली. त्यांनी `सुर्वे, महानोर व ग्रेस यांची कविता : विशेष अध्ययन ` हा प्रबंध सादर केला होता. ज्येष्ठ समीक्षक डॉ. रेखा इनामदार-साने यांनी मार्गदर्शन केले.

प्रा. सुजाता शेणई या येथील मराठवाडा मित्रमंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयात अध्यापक आहेत. तसेच त्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या `युवकभारती`अकरावी (मराठी) साठी सहनिमंत्रक म्हणून कार्यरत आहेत. 

--

No comments: