Here info on a a bi-lingual journal of creative expression हाकारा । hākārā edited by my colleague, Dr Ashutosh Potdar, Associate Professor, FLAME University,
हाकारा । hākārā : a bi-lingual journal of creative expression
--
हाकारा । hākārā : a bi-lingual journal of creative expression
हाकारा । hākārā
(नाम/noun)
//: (m) हाक, बोलावणे;
a call, a general or a great and continued calling
हाकारा । hākārā, is an online bilingual journal on literary and visual arts. With a thematic focus for each issue, the journal is published in English and Marathi while exploring a wide range of forms including critical writings, art works, fiction and videos.
Contemporary lives and actions have been radically influencing expressions of writing, image-making and publicizing. Conversely, the production, consumption and circulation of expressions have influenced the aesthetics, politics and networking today. In this context, objective of हाकारा । hākārā, is to explore and practice newer ways of producing and appreciating creative expressions while encouraging dialogue between different fields of expressions. Considering a rich and diverse body of creative work, हाकारा । hākārā focuses on creative and critical writing in Marathi and English across literary and visual forms of expressions.
हाकारा । hākārā is published online in freely accessible and interactive format by focusing on the area that address the diversities and the synergies implicit in literary and visual cultures. Interestingly, positioned within academic and non-academic spheres, हाकारा । hākārā is interested in the sharing of research, speculations, literary and visual work presented in reflective ways that respond to the current debates while being attentive to the nuanced understanding and interconnectedness of content, form and society.
हाकारा । hākārā particularly encourages innovative nature of literary and visual images, critical artistic practices and developments that inform the contemporariness of the medium (and its pasts and futures), as well as the formal qualities of words and images in changing contexts.
Published once in three months, हाकारा । hākārā has been initiated by writer and scholar, Ashutosh Potdar. He co-edits हाकारा । hākārā with Noopur Desai, art-writer and researchers.
हाकारा । hākārā can be seen here: www.hakara.in. For more information, please contact: info@hakara.in
Ashutosh Potdar is a writer and a scholar writing in Marathi and English. He is a faculty of literature and drama at FLAME University, Pune.
Noopur Desai is art writer and researcher writing in Marathi and English. She is a doctoral student of visual arts studies.
हाकारा । hākārā : अभिव्यक्तीसाठी द्वैभाषिक नियतकालिक
हाकारा । hākārā
(नाम/noun)
//: (m) हाक, बोलावणे;
a call, a general or a great and continued calling
हाकारा । hākārā या मराठी आणि इंग्रजीतून प्रकाशित होणा-या ऑनलाईन नियतकालिकाच्या अवकाश-निर्मितीमागे भवताल, आपणआणि आपली निर्मिती यामधील गुंतागुंतीचं नातं समजून घेण्याची भूमिका आहे.
जगणं, भाव-भावना, सौंदर्य आणि संस्कृतीविषयक विचार आपल्या कला-दृष्टी आणि निर्मितीवर, लिहिण्यावर आणि वाचण्यावर कसे आणिकोणते प्रभाव पाडत असतात? मानवी बदल कलाविषयक देवाण-घेवाणी आणि सौंदर्य- जाणिवांशी कसे जोडून घेत असतात? सतत बदलत्याआणि प्रवाही असणाऱ्या कला-जाणिवा आपला भवताल कसा घडवत असतात? या आणि इतर मुद्द्यांचं आकलन लिखित आणि दृश्यमाध्यमातून हाकारा । hākārāच्या पारावरुन संवादी रीतीनं मांडण्याचा प्रयत्न आहे.
काळ, संस्कृती आणि कला यांच्यातील देव-घेव नेहमीच बहुपदरी आणि बहुपेडी राहिलेली आहे. अभिव्यक्ती सद्यकालात घडत जात असतेतर उद्याकडे पाहात आताचा काळ गतकाळाशी आपली नाळ जोडून असतो. कलाकृतीमध्ये तीनही काळ एकमेकांत अशा अनोख्या रितीनेगुंतलेले असतात की त्यांच्यातील सीमारेषा धुसर होतात. त्रि-काळाच्या सत्य आणि आभासी खेळातून कला अभिव्यक्ती, सौंदर्यभान आणितिचे बदलते निकष यातून समकालीन अभिव्यक्ती साकारत असते. अभिव्यक्तीने निरनिराळे घाट, शैली आणि रचना अंगिकारणं तसंच अशाअभिव्यक्तीचं सखोल आकलन करुन घेणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. अशा तऱ्हेनं आकाराला येणारी नाविन्यपूर्ण निर्मिती आणिचिकित्सक प्रक्रिया हाकारा । hākārā च्या मांडणीचा गाभा असेल.
हाकारा । hākārā च्या पारावरून लिखित आणि दृश्य कला माध्यमात ऐरणीवर असलेल्या मुद्द्यांविषयी सखोल चिंतन आणि समग्र चर्चाघडवून आणणं हा उद्देश आहे. आशय, घाट आणि रचनेचे ‘संहिता’ अंतर्गत आणि ‘संहिता’ बाह्य भवतालाशी असलेल्या आंतरिक संबधांचंविश्लेषण इथं केलं जातं. कला-माध्यमांचं आंतर-संवादी स्वरुप निरखणं जसं महत्वाचं ठरतं तसंच त्यांची इतिहास, तत्त्वज्ञानाबरोबरच विज्ञानआणि तंत्रज्ञानासारख्या ‘इतर’ विद्याशाखांशी घातली जाणारी सांगड हाकारा । hākārā साठी मोलाची आहे.
हाकारा । hākārā चा पार वैविध्यपूर्ण शैलीतले लिखाण आणि मांडणी, समीक्षा, कविता, गाणी, कथात्म-साहित्य, वाद-विवाद, मुलाखती,दृक-श्राव्य आणि दृश्य रूपांची गुंफण अशा विविधांगी आविष्कारांतून आपल्याशी मुक्त आणि थेटपणे संवाद साधेल असा विश्वास हाकारा ।hākārā च्या संपादकांना वाटतो.
तीन महिन्यातुन एकदा प्रकाशित होणा-या हाकारा । hākārā ची सुरुवात आशुतोष पोतदार यांनी केली आहे. नूपुर देसाईंच्या बरोबरीनेआशुतोष पोतदार हाकारा । hākārā चे संपादन करतात.
हाकारा । hākārā वाचण्यासाठी: www.hakara.in. इथे भेट द्या. अधिक माहितीसाठी info@hakara.in या ई-मेलद्वारे संपर्क साधावा.
आशुतोष पोतदार नाटककार, कवी आणि संशोधक आहेत. ते मराठी आणि इंग्रजीमधून लेखन करतात. फ्लेम युनिवर्सिटी, पुणे येथे ते साहित्य आणि नाट्य हेविषय शिकवितात.
नूपुर देसाई कला समीक्षक आणि संशोधक आहेत. त्या समकालिन दृष्य-कला या विषयात पी एचडी करत आहेत.
--
Dr Ashutosh Potdar
Associate Professor,
FLAME University,
Lavale,
Pune-412115 (India)
Tel: +91-20-67906133
Mobile : +917387005358
www.flame.edu.in
My Blog: http://ashupotdar. blogspot.in/
No comments:
Post a Comment