Sunday 31 January 2010

अपयश आलं म्हणून, मरायचं नाही मला

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या रोज वाचून अस्वस्थता येत असतानाच तरुणांमध्ये सकारात्मक प्रेरणाही आहेत असे आश्वासक दृश्यही पाहायला मिळते आहे. औरंगाबाद शहरातील अनेक शाळांमध्ये शारदा मंदिर शाळेतील शिक्षिका श्रीमती वीणा पवार यांनी लिहिलेली ही कविता मोठया फलकावर प्रिंट करून लावलेली दिसली. शिव योद्धा या युवक संघटनेने प्रजासत्ताक दिनी हे फलक लावले तेव्हा शेकडो विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने त्या खाली सह्या करून आपली अनुमती दर्शविली. ती ही कविता:

अपयश आलं म्हणून, मरायचं नाही मला
मी आहे ज्ञानार्थी, परीक्षार्थी नाही
तणावातले जीणं मला मान्य नाही

मी आहे कासव, ससा कासवाच्या गोष्टीतला
अपयश आलं म्हणून, मरायचं नाही मला

काळ्या ढगांनी झाकलं, म्हणून सूर्य का कधी खचतो?
ग्रहणाच्या भीतीने का कधी आकाश सोडून पळतो?

आई-बाबा! माझंही एक स्वप्न आहे, माणूस म्हणून जगायचं
तुमचं नाव राखायचं, खूप खूप मोठं व्हायचं

तुम्ही हिम्मत दिली तर, आयुष्याचं करीन सोनं
पाठीवर हात ठेवून धीर द्या, एवढंच माझं मागणं



--

No comments: