Monday, 22 April 2024

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हा विषयच आता विसरायचा?

 




महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील  मतदानात   पाच लोकसभा मतदार केंद्रात  मतदान झाले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हा विषय कोणत्याही पक्षाच्या अथवा आघाडीच्या   प्रचारात चर्चेला  देखील आल्याचे  आढळून आले नाही. त्यात फारसे आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही हे मात्र खरे.  याचे कारण मुळात १९एप्रिल २०२४ अखेरपर्यंत काही महत्त्वाच्या जागांवर या आघाड्या  आपापले कोण उमेदवार उभे करणार आहेत हे सुद्धा जाहीर होत नव्हते.  


गेल्या काही महिन्यांमध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा हा विषयच प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी  बासनात गुंडाळला आहे असे निश्चितपणे दिसत होते. इतर भारतीय भाषांपैकी दुसऱ्या एखाद्या भाषेची मागणी पुढे येत नाही तोपर्यंत मराठीची मागणी 

“फाईल”  करून ठेवा असा सांगावा त्यांच्या वतीने साहित्य अकादमीला देण्यात आला आहे हे उघड सत्य झाले आहे.  


मराठी भाषा अभिजात दर्जा समितीचे अध्यक्ष प्रा डॉ रंगनाथ पठारे यांनी या विषयातून पूर्णपणे अंग काढून घेतले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नियुक्त केलेल्या रंगनाथ पठारे समितीने आपला अहवाल महाराष्ट्र शासनाला मे २०१३ मध्ये सादर केला.  मसुदा समितीचे निमंत्रक प्रा. डॉ हरी नरके यांनी जीवाचे रान करून महाराष्ट्रात सर्वत्र हिंडून केंद्र सरकारकडे आपली मागणी अत्यंत पद्धतशीरपणे सादर केली.  साहित्य अकादमीच्या सर्व सभासदांनी एकमताने आपली मान्यता दिली . आता निर्णय फक्त प्रधान मंत्री यांच्या हातात राहिला आहे. गुजराती भाषे ला  अभिजात दर्जा मिळत नाही तोपर्यंत मराठी ची मागणी आम्ही कशी मंजूर करू असे एका ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी म्हटल्यापासून पुढे काहीही सरकले नाही. हा इतिहास देखील आता जुना झाला आहे. 


प्रा डॉ हरी नरके यांचे दिनांक ९ ऑगस्ट २०२३ रोजी अकस्मात निधन झाल्यानंतर ही  मागणी रेटून द्यायला आता  मराठी भाषेचा  तेवढाच क्रियाशील कार्यकर्ता  राहिला नाही. समितीचे बाकी सभासद आहेत साहित्यिक,  भाषा अभ्यासक आणि व्यासंगी विद्वान प्राध्यापक. आपापल्या विषयाच्या कामात गढून गेलेले आहेत. केंद्र सरकारकडून करून घ्यायचे अभिजात दर्जा मंजुरीचे काम आता करून घेणे आम्हाला आता शक्य नाही. तो आमचा पिंड नाही. तेवढा वेळ आमच्याकडे नाही,  अशी त्यांची स्वाभाविक भूमिका आहे.  आताचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, मराठी भाषा मंत्री, खासदार, आमदार या सगळ्यांना या विषयांमध्ये काही स्वारस्य आहे का याचीच शंका आहे.  तेवढा वेळ आणि स्वारस्य आहे कोणाला! लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत या विषयाला प्राधान्य कोण देणार? 

मुळात हा विषय इतका महत्त्वाचा खरंच आहे का हा देखील एक प्रश्न आहे.  त्यामुळे कोणत्याही पक्षाच्या-- मग ते सत्ताधारी आघाडीचे असो की विरोधी आघाडीचे--, नेत्यांनी आपापल्या जाहीरनाम्यात अभिजात भाषेचा एक शब्द देखील अद्याप काढलेला नाही. 


“अभिजात दर्जा पाठपुरावा समिती” काय करणार? 


                        

अध्यक्ष “अभिजात दर्जा पाठपुरावा समिती” श्री   ज्ञानेश्वर मुळ्ये 



                                    प्रा डॉ राजा दीक्षित



                            श्री संजय नहार



अत्यंत अनपेक्षितपणे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने “अभिजात दर्जा पाठपुरावा समिती”  १४ फेब्रुवारी २०२४ रोजी नियुक्तकेली.  भारतीय विदेश सेवेतुन  निवृत्त झालेले  सध्या दिल्लीत वास्तव्य असलेले श्री   ज्ञानेश्वर मुळ्ये   या समितीचे अध्यक्ष आहेत. पुण्यातील सरहद संस्थेचे श्री संजय नहारआणि मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रा.  डॉ राजा दीक्षित हे उरलेले दोन सदस्य आहेत. या तिघांचे शासन दरबारी  असलेले वजन अभिजात दर्जा  समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागाला आशा असावी. दर महिन्याला दिल्लीत प्रत्यक्ष भेटीत किंवा ऑनलाईन मीटिंग वर या विषयाचा पाठपुरावा करावा  अशी अपेक्षा आहे.  चौदा  एप्रिल २०२४ पासून महिनाभरात एक ऑनलाईन मीटिंग होऊन देखील गेली आहे. 


मात्र प्रा.  डॉ राजा दीक्षित या समितीच्या उपयुक्ततेबाबत फार आशावादी दिसत नाहीत. श्री संजय नहार यांना “हा प्रश्न मराठी प्रेमीनी रस्त्यावर  उतरल्या खेरीज सुटणार नाही” असे  वाटते. मराठी भाषेचे नुसते प्रेम, तिच्याविषयी आस्था, अशा भावनेतून काहीही घडणार नाही. हा प्रश्न राजकीय पद्धतीनेच सुटू शकेल असे त्यांनी मोकळेपणे सांगितले आहे. 


मात्र हेही खरेच की  हरिभाऊ नरके यांनी निधनापूर्वीच्या आपल्या भाषणात या  विषयातील खडतर वाटचालीची  कल्पना दिली होती. 


‘प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्याच्या भाषेला अभिजात दर्जा मिळत नाही तोवर आम्ही इतर भाषांचा विचार कसा करू” असे एका ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी खाजगीत सांगितले होते. त्यामुळे महाराष्ट्राचे सध्याचे मंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सध्या हा विषय बोलत सुद्धा का नाहीत याचा अंदाज करता येतो. पाठपुरावा समितीला किती कठीण वाटचाल करायची आहे याची कल्पना यातून येते. 


तत्कालीन प्रधान मंत्री डॉ मनमोहन सिंग यांच्या कार्यकालात तमिळ. तेलुगु, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या सहा भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळाला. त्यांच्यानंतर प्रधानमंत्री झालेल्या श्री नरेंद्र मोदी यांच्या काळात अद्याप एकाही भारतीय भाषेला  अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही ही वस्तुस्थिती आहे. 


विद्यमान लोकसभा  निवडणुक प्रचाराच्या उरलेल्या दिवसात मराठीला किंवा इतर कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे शक्य आहे का याचा विचार आपणच केलेला बरा.   हा विषय आपण हाती घेऊ आणि असा दर्जा मिळवून देऊ असे सत्ताधारी पक्षाने  सांगण्याची शक्यता दिसत नाही. उरलेल्या पक्षांनी आणि त्त्यांच्या आघाड्यांनी  एकमेव हा विषय हाती घेऊन निवडणूक लढविणे ही शक्यता नाही. अशा स्थितीत माय मराठीचे भविष्यात काय होणार हे कोण सांगणार!  


असे असले तरी पुण्यातील सृष्टी सांस्कृतिक व विकास प्रतिष्ठान या संस्थेचे कार्यकर्ते अजून पूर्णतः नामेद झालेले नाहीत.  “मराठीला अभिजात भाषेचा दर्जा: वास्तव की मृगजळ?” या शीर्षकाची एक पुस्तिका त्यांनी अलीकडेच प्रसिद्ध केली आहे. पत्रकार प्रा डॉ किरण ठाकूर आणि संस्थेचे संस्थापक प्रशांत कोठडीया यांनी  या पुस्तिकेत या विषयावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्याची उत्तरे (frequently asked questions”  या स्वरूपात तिची मांडणी केलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या उरलेल्या कालखंडात (आणि त्यानंतर देखील, केव्हाही) सत्ताधारी  पक्ष आणि विरोधक यांना विचारण्यासाठी यात प्रश्न आहेत. फक्त पत्रकारांनीच नव्हे तर कोणाही जागरूक मतदारा ने  हे प्रश्न विचारावे आणि त्याची उत्तरे शोधावी अशी कल्पना यामागे आहे.


पीडीएफ  स्वरूपात असलेली ही पुस्तिका  विनामूल्य  उपलब्ध आहे. त्यासाठी संपर्काचा पत्ता drkiranthakur@gmail.com prashant.kothadiya@gmail.com   

 


लेखक प्रा डॉ किरण ठाकूर


       
 प्रा डॉ किरण ठाकूर 



                                            श्री प्रशांत कोठडीया 



                                   दिवंगत प्रा डॉ हरी नरके 



Thursday, 11 April 2024

वाळवी : शेतकऱ्यांची मित्र

 


गांडूळ आपल्या शेतकऱ्यांचे मित्र आहेत याची कल्पना अगदी अलीकडे पर्यंत कुणालाच नव्हती. तसंच वाळवी आपल्या शेतकऱ्यांची उपकारकर्ती मित्र आहे याची जाणीव देखील कोणाला नव्हती.

महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांना वाळवीचे महत्व जाणवले नव्हते की काय असे वाटते. कारण पिकांना वाळवी पासून संरक्षण करण्यासाठी जमिनीत वाळवी मारण्यासाठी विषारी औषध वापरण्याची शिफारस बरेच वेळा केली जात होती.वाळवी शेतकऱ्यांवर किती उपकार करते याचा अभ्यास महाराष्ट्रातच नव्हे तर जगात कुठेही फारसा होत नव्हता.

वीस पंचवीस वर्षांपूर्वी अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिकणारे मनोहर खके मृदा विज्ञान हा विषय शिकायचे तेव्हा अभ्यासक्रमात वाळवीच्या उपयुक्ततेचा उल्लेख देखील होत नव्हता अशी आठवण ते सांगतात.

आपल्या स्वतःच्या अनुभवावरून मृदा संशोधक या नात्याने खके सरांनी प्रत्यक्ष शेती मध्ये विविध प्रयोग करीत शेतकरी बंधू /भगिनींना वाळवी चे महत्त्व पटवून द्यायला सुरुवात केली. आता एखाद्या एकांड्या शिलेदारासारखे ते महाराष्ट्रात ठिकठिकाणी वाळवी चे महत्व शेतातील प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे दाखवून देतात. शेतकरी बांधव हळूहळू त्यांच्या ह्या मोहिमेत सहभागी व्हायला लागले आहेत. देशातील कृषी विद्यापीठात देखील वाळवी उधई, पांढऱ्या मुंग्या, दीमक, आणि termite अशा विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कीटकांवर पीएचडी दर्जाचे संशोधन होऊ लागले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शोधगंगा वेबसाईट वर https://shodhganga.inflibnet.ac.in/ नोंदवलेल्या संशोधन प्रकल्पावरून हे आता लक्षात यायला लागले आहे.

अशा महत्त्वाच्या संशोधनाचे निष्कर्ष मात्र सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. याचे कारण ते इंग्रजी भाषेत असतात. जड बोजड असतात. हे सर्व ज्ञान शोधपत्रिकेतच रिसर्च जर्नल मध्येच असते. तुम्हा आम्हा सामान्य वाचकांपर्यंत मराठी (किंवा मातृभाषेत) ते प्रसिद्ध होत नाही. वर्तमानपत्रात तर अशा गोष्टींना जागाच नसते. हे ज्ञान वाचकांपर्यंत पोहोचतच नाही. त्याचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे वाळवी विषयी असलेले गैरसमज तसेच टिकून रहातात. इतकेच नव्हे तर ते वाढत जातात. याबरोबरच अंधश्रद्धा आणि अज्ञान वाढत राहते. विषारी नाग आणि बिनविषारी सर्प सुद्धा वाळवीच्या वारुळात वास्तव्याला असतात हा तसाच एक अंधश्रद्धेचा आणि अज्ञानाचा भाग.
ही अंधश्रद्धा आणि अज्ञान दूर करण्याचे जणू व्रतच खके सरांनी हाती घेतले आहे. याविषयी नंतर केव्हातरी सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेतली पाहिजे.

“वाळवी लागली” याचा अर्थ शहरातील इमारतीतील कपाटे, पुस्तके, कपडे, स्वेटर्स यांच्यावर आता हल्ला होणार आणि मोठे नुकसान होणार हे जाणून कीटकनाशकाचे फवारे मारणे आता आवश्यक झाले आहे असे समजले जाते. शहरातील हे अनुभव चुकीचे नाहीत. असे उपाय करणे भागच असते. परंतु शेतात मात्र वाळवी दिसली की आता शेतातील वाळलेली खोडं, फांद्या. काटक्या, ढलप्या या हळूहळू फस्त करत झाडांना जीवदान देण्याची प्रक्रिया सुरू झाली असते. हे शेतकऱ्याच्या दृष्टीने शुभ चिन्ह मानलं पाहिजे असा आग्रह मृदा अभ्यासक श्री खके धरायला सांगतात. राज्यातील कृषी प्रकल्पांना वाळवी मूळे जणू संजीवनी मिळते हे त्यांनी दाखवून दिले आहे.

त्यापैकी काही उदाहरणे येथे नमूद केली आहेत: मेळघाटातील फळबागेत आंबा कलमे आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतात एवढ्या मोठ्या आणि खोलवर गेलेल्या भेगा आहेत की माणसाचा पाय त्यात जाण्याची भीती असते. यावर ऊपाय काय ? तर शेतातल्या काटक्या, वाळलेल्या फांद्या, पाला पाचोळा या भागावर पसरवून ठेवा. मल्चिंग करा असा सल्ला खके सर देतात. जमिनीत आर्द्रता टिकून राहण्यासाठी याची मदत होते. ओल खोलवर जाते. वाळवी येते तेव्हा ती हळूहळू वाळलेलं लाकूड, ढलप्या फस्त करायला लागते. वरचा पापुद्रा खाल्ला की खोडाचा/ फांदीचा ताजातवाना भाग दिसू लागेल. मूळ झाडाला संजीवनी मिळू लागली आहे असा त्याचा अर्थ आहे.

ऑस्ट्रेलिया, पश्चिम आफ्रिका, थायलंड, लेगोस आदी देशात नुकसानकारक वाळवी आणि उपकारक वाळवी यांची तुलना करण्याचे काम अग्रोनोमी एग्रीकल्चर पेस्ट कंट्रोल अशा विविध अंगानी संशोधन मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे.

स्वतः खके सर आपल्या व्यक्तिगत पातळीवर तसेच नैसर्गिक शेतीच्या ग्रुप वर प्रश्नोत्तरे, लेख, फोटो आणि व्हिडिओ यांच्या माध्यमातून वाळवी कसे काम करते हे शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा निष्ठापूर्वक प्रयत्न करीत आहेत. वाळवी वाळलेल्या लाकडाला खात खात हळूहळू जमिनीमध्ये खोलवर प्रवास करत पाण्यासाठी वाट निर्माण करते. पावसा पाण्याच्या दिवसात त्यामुळे तिला आणखी खाली जाता येते. पिकांना त्यामुळे जगता येते. झाडांच्या मुळाच्या खोलवर जाता येते असे निष्कर्ष आता कृषी वैज्ञानिक काढू लागले आहेत.

पश्चिम आफ्रिका आणि झांबिया या देशांमध्ये मुंग्या आणि वाळवी यांच्या वाटचालीमुळे शेताच्या मातीचा वरचा थर अधिक उत्पादनक्षम आणि उपयुक्त होतो असे अनुभवाला आले आहे. या कीटकांच्या लाळेमुळे आणि विष्ठेमुळे शेत जमीन अधिक समृद्ध होते असे निष्कर्ष प्रयोगाद्वारे काढण्याचे आता प्रसिद्ध झाले आहे. वाळवीच्या वारुळाची माती मुद्दाम जाणीवपूर्वक पिकांची पेरणी करण्यापूर्वी शेतकरी करू लागले आहेत. गव्हाच्या अशा शेतीच्या उत्पन्नात 36 टक्क्यांनी वाढ झाली असे जाहीर झाले आहे.
पिकाची पेरणी करण्यापूर्वी आपल्या शेतावर लाकडी फळकुट पसरवून वाळवी ला आकर्षित करण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. चांगली कष्टपुष्ट वाळवी मुद्दाम गोळा करून आपल्या शेतातील तळ्यात टाकली जाते. ते माशांना खाद्य म्हणून उपयुक्त ठरते असेही अनुभव इंटरनेटच्या विश्वात वाचायला मिळतात.

आपल्याकडे वाळवीचे असे उपयोग अद्याप होत नाही. तसा कोणी विचार केल्याचेही ऐकिवात नाही. उलट “वाळवी लागली” असे काही ऐकले तर शेतकरी सुद्धा विषारी कीटकनाशके आणून फवारून या निष्पाप मित्राची हत्या मात्र करीत असतात, हे वास्तव आहे.

अशा पार्श्वभूमीवर खके सरांनी याविषयीचे प्रयोग किती वर्षांपूर्वी केले याची दखल घेतली पाहिजे. विदर्भातील मेळघाट या दुर्गम आदिवासी क्षेत्रात सुमारे वीस पंचवीस वर्षांपूर्वी त्यांनी हे प्रयोग यशस्वी केले होते. आज आदिवासी स्त्री पुरुषांचे आणि बालकांचे कुपोषण टाळायचे असल्यास त्यांना प्रथम स्थानिक भाजीपाला आणि फळ फळावळ लावायला शिकवले पाहिजे. त्याच्यावरच त्यांचे पोट भरले पाहिजे म्हणजे कुपोषणाची समस्या राहणार नाही या भूमिकेचा ते पुरस्कार करतात. त्याचे उत्तम परिणाम दिसून आले . परंतु शासकीय किंवा अ- शासकीय पातळीवर अशा गोष्टी उपेक्षित राहतात. तसेच याबाबतीतही घडले असे खके सर सांगतात.

जळगाव भागातील केळीचे उत्पन्न काढणारे श्री जयस्वाल यांनीही आपल्या केळीच्या बागेत वाळू लागलेल्या केळीच्या खांबाला वाळवी खाऊ लागली आहे हे पाहिल्यावर ही आनंदाची बातमी सरांना मुद्दाम फोन करून कळवली. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आपल्या मोबाईल वरच्या व्हिडिओ वरून चित्रण करून ठेवले. वाळवी ने नुकसान तर केले नाहीच परंतु आपल्या केळीला नवे जीवन कसे दिले हे ते आता आपल्या मित्र परिवारा ला दाखवू लागले आहेत;
‘ज्योतसे ज्योत जगाते चलो’ या उक्तीप्रमाणे हळूहळू ज्ञान पसरत चालले आहे.

Wednesday, 10 April 2024

Termite: farmers’ friend

 


Pune, April 10: Until recently, it was not known that earthworms were farmers' best friends. Similarly, most Indian farmers do not know that termites are their equally important friends. As Professor Manohar Khake, a Pune-based soil scientist, recalls that the beneficial effect of termites in farming was not talked about in the syllabus of agronomy subject in post-graduate studies at the of Agriculture University when he was a student.
Even now termite is considered a dreaded pest to be treated with poisonous pesticides meant to protect books, clothes, furniture, and, in general, urban buildings. Ignorant farmers also are not aware that termites are their best friends.
The situation is now changing gradually across the world including in India. Agriculture universities have begun to teach the good or bad effects of termites in rural and urban settings. Particularly the practitioners of organic farming
Know how earthworms are precious in vermiculture.
Research papers on the internet indicate a growing interest in the beneficial impact of termites as per the studies available on the internet in India, Australia, Western Africa, USA and Thailand. In India, such data is available freely at the University Grants Commission website, https://shodhganga.inflibnet.ac.in/. However, farmers rarely utilise such data because these are in English and not in the local languages. The language in English is presented in academic jargon, and not in essay-to-understand presentations for farmers and farm labourers as practised in their extension programmes offered in the farm fields. As a result, ignorance about termites and the superstitions about termites continue to persist. Worse, superstitions are practised, says Prof Khake. He laments that the farmers continue to ‘kill’ their friends with pesticides.
Research in Australia, Western Africa and Thailand
Researchers in Australia have demonstrated that creatures like ants and termites once considered pests, could prove invaluable for improving soil fertility. The insects dig tunnels that enable plants to have better access to underground water sources. They also produce nitrogen-rich bacteria which are ploughed into the soil through their saliva and faeces. Studies show that land treated with ants and termites showed a 36 per cent increase in wheat production.
The benefit of using termites to increase crop production is not any more news for many African farmers. In Western Africa, farmers lay wooden planks in the soil to attract termites and in Zambia farmers use the soil produced in termite nests as topsoil.
Villagers crush and spread the soil from the mounds on their rice paddies before planting; it acts as a natural fertilizer. The adult termites are collected and fed to several types of fish, which are raised as a food source. They also use the termite mounds as gardening beds to grow vegetables, due to the high nitrogen content of the dirt.
More recently, villagers have begun to sell the mushrooms that are found in some of the mounds. Considered a delicacy, the cash crop of mushrooms may help encourage farmers to conserve the mounds.
Links between ants, termites and soil health
Across an ocean from the Laotians, a team of researchers in Australia discovered that termites and ants can help boost wheat crop yields in arid climates. They looked at soil mineral content and water absorption between termite-containing fields and those treated to exclude the insects.
The results showed a wheat yield of 36 per cent more in the fields containing termites and ants. The tunnels dug by the insects allowed rain to fall deeper into the ground, retaining moisture at three times the rate of the treated fields.
The second benefit to ant and termite activity in the fields was the soil's nitrogen content. The gut bacteria of termites contain high levels of nitrogen. Due to the nature of how these insects dig their tunnels, that nitrogen is transferred to the soil, as per the data of available outcome of the research. Traditional Farmers and practitioners of organic farmers in India have not been taught about the experiences in these countries. Mr Khare however says he had telling the farmers that termites and earthworms are their friends. As a lone crusader, he began,some 20 years ago, demonstrating the importance of the termites that silently eat away the dried bark of the trees. Recently, he taught them the beneficial use of termites at a farm at Aditya Agro Farm in Shahapur district Thane on a plot of … hectare where 450 mango trees are planted in black cotton soil. Several full-grown trees appear to be “infested” with termites. However, the owners of the mango trees and their farm labour have been following Mr Khake’s lessons. They are not worried when termites begin creeping over the tree trunks and branches of the trees. Mr Khake had taught them that the termites eat away only the dead wood. In the process, they remove the bark of the trees. As a result, white resh-looking new bark has emerged. This demonstrates that the trees are not dead. On the contrary, these are out to grow further.
In Melghat in the Vidarbha region of Maharashtra, Mr Khake had trained tribals to spread dry leaves, branches and weeds over the farm soil so that such mulching leads to retaining moisture. Termites there. Mr Khake demonstrated to the tribals how the mulch leads to the conservation of moisture under the soil. lt helps in growing shrubs, plants and trees. His termites also love this moisture, as do a variety of other bugs and insects. Mr Khake explains to the farmers that a moist environment encourages termites to explore the area by digging thin tunnels and looking for food (namely their wood).
In another district in Western Maharashtra, a section of the farm is completely dried to such an extent that the soil has developed deep and wide cracks to the extent that a farmer can put his feet inside the crack.
A part of the same farm has been covered by dried leaves, tree branches and sticks. This is mulch to cover the soil surface. It is beneficial to conserve soil moisture. It improves fertility and soil health and leads to a reduction in weed growth. Khake has demonstrated to farmers that the bark chips are very useful for mulching. The soil generated by the activity of the termites is very soft and is of high quality good for farming.
A mound of earth created by ants or termites is of high quality, and useful as manure in farming as Khake has been advising the farmers during his visits to this region in Maharashtra. One of his followers has begun helping him in producing video stories under his guidance. It shows that the stem of even a banana plant eating its dried. He says the plant flourishes further and does not die.
He has tried to eradicate the superstition that the ant hill or termite hills are the abodes of cobra and other reptiles. He has demonstrated that termites create tunnels that enable plants to access groundwater more easily. Poor soil fertility massively reduces crop yield and contributes to food shortages across the region.
Khake concedes that termites are found worldwide and can be beneficial or harmful depending on the species and location. they cause a structural collapse of homes, fences and other buildings If it is causing such damage, one should take pest control measures. But in nature, the termites are responsible for breaking down dead or decaying wood and they must be treated as farmers friends.



विनम्र सेवक दीमक: किसानों के मित्र
प्रोफेसर डॉ. किरण ठाकुर
पुणे। हमें हाल तक यह नहीं पता था कि केंचुए किसानों के सबसे अच्छे दोस्त होते हैं। इसी तरह, अधिकांश भारतीय किसानों को अभी भी यह नहीं पता है कि दीमक भी उनके उतने ही महत्वपूर्ण मित्र हैं। पुणे निवासी प्रख्यात मृदा वैज्ञानिक प्रोफेसर मनोहर खके याद करते हैं, साल 1980 में जब वह छात्र थे। तब महाराष्ट्र के कृषि विश्वविद्यालय में स्नातकोत्तर अध्ययन के दौरान कृषि विज्ञान विषय के पाठ्यक्रम में खेती में दीमकों के लाभकारी प्रभाव के बारे में बात नहीं की गई थी। तब भी और अब भी दीमकों को एक खतरनाक कीट माना जाता है और सामान्य तौर पर किताबों, कपड़ों, फर्नीचर और शहरी इमारतों की सुरक्षा के लिए इन्हें जहरीले कीटनाशकों का इस्तेमाल कर नष्ट किया जाता है।
अफसोस की बात है कि हमारे किसान दीमकों के उनके लिए फायदेमंद होने की मूल अवधारणा को समझने से काफी दूर है। वास्तव में किसान इसे कैसे समझें, इसकी तो बात ही छोड़िए।
शुक्र है कि भारत समेत दुनिया भर में स्थिति अब धीरे-धीरे बदल रही है। कृषि विश्वविद्यालयों ने ग्रामीण और शहरी परिवेश में दीमकों के अच्छे या बुरे प्रभावों के बारे में पढ़ाना शुरू कर दिया है। विशेष रूप से जैविक खेती करने वाले अपने स्वयं के शोध के माध्यम से अधिक जागरूक हो रहे हैं।
इंटरनेट पर उपलब्ध अध्ययनों के अनुसार शोध पत्र भारत, ऑस्ट्रेलिया, पश्चिमी अफ्रीका, अमेरिका और थाईलैंड में दीमकों के लाभकारी प्रभाव का अध्ययन करने में बढ़ती रुचि का संकेत देते हैं।
भारत में, ऐसा डेटा विश्वविद्यालय अनुदान आयोग की वेबसाइट, (https://shodhnga.inflibnet.ac.in/) पर निःशुल्क उपलब्ध है। हालाँकि, किसान ऐसे डेटा का उपयोग शायद ही कभी करते हैं क्योंकि ये अंग्रेजी में होते हैं, स्थानीय भाषाओं में नहीं। इसके अलावा, अंग्रेजी भाषा को अकादमिक शब्दजाल में प्रस्तुत किया जाता है, न कि खेतों में किसानों और खेत मजदूरों को पेश किए जाने वाले उनके विस्तार कार्यक्रमों में आसानी से समझ में आने वाली भाषा में।
परिणामस्वरूप, दीमकों के बारे में अज्ञानता और परिणामी अंधविश्वास दोनों ही दुखद रूप से जारी हैं। प्रोफेसर खके अफसोस जताते हुए कहते हैं, इससे भी बुरी बात यह है कि जब ये अंधविश्वास जमीन पर लागू होते हैं, तो इसके परिणामस्वरूप उन अज्ञानी किसानों द्वारा कीटनाशकों के साथ इन नेक इरादे वाले दोस्तों का अनावश्यक और पूरी तरह से टाला जा सकने वाला 'खात्मा' किया जाता है, जो सोचते हैं कि वे अपनी फसलों को 'बचा' रहे हैं।
ऑस्ट्रेलिया, पश्चिमी अफ्रीका और थाईलैंड में अनुसंधान ऑस्ट्रेलिया में शोधकर्ताओं ने साबित किया है कि चींटियों और दीमक जैसे जीव-जिन्हें कभी कीट माना जाता था-मिट्टी की उर्वरता में सुधार के लिए अमूल्य साबित हो सकते हैं। ये कीट सुरंग खोदते हैं जो पौधों को भूमिगत जल स्रोतों तक बेहतर पहुंच प्रदान करते हैं।
वे नाइट्रोजन युक्त बैक्टीरिया भी पैदा करते हैं, जो उनकी लार और मल के माध्यम से मिट्टी में मिल जाते हैं। वास्तव में, अध्ययनों से यह भी पता चला है कि चींटियों और दीमकों से उपचारित भूमि में गेहूं के उत्पादन में 36 प्रतिशत की वृद्धि देखी गई है! फसल उत्पादन बढ़ाने के लिए दीमकों का उपयोग करने का लाभ अब कई अफ्रीकी किसानों के लिए कोई नई बात नहीं है।
पश्चिमी अफ़्रीका में, किसान दीमकों को आकर्षित करने के लिए मिट्टी में लकड़ी के तख्ते बिछाते हैं और ज़ाम्बिया में किसान दीमकों के घोंसलों में पैदा हुई मिट्टी को ऊपरी मिट्टी के रूप में भी उपयोग करते हैं। ग्रामीण रोपण से पहले अपने धान के खेतों में टीलों की मिट्टी को तोड़कर फैला देते हैं, जो प्राकृतिक उर्वरक के रूप में काम करती है। यहां वयस्क दीमकों को इकट्ठा किया जाता है और कई प्रकार की मछलियों को खिलाया जाता है, जिन्हें भोजन स्रोत के रूप में पाला जाता है। गंदगी में नाइट्रोजन की मात्रा अधिक होने के कारण वे दीमकों के ढेरों का उपयोग सब्जियां उगाने के लिए बागवानी बिस्तर के रूप में भी करते हैं।
हाल ही में, ग्रामीणों ने कुछ टीलों में पाए जाने वाले मशरूम को बेचना शुरू कर दिया है। स्वादिष्ट व्यंजन मानी जाने वाली मशरूम की नकदी फसल किसानों को टीलों के संरक्षण के लिए प्रोत्साहित करने में मदद कर सकती है। चींटियों, दीमकों और मिट्टी के स्वास्थ्य के बीच संबंध लाओटियन सागर के पार, ऑस्ट्रेलिया में शोधकर्ताओं की एक टीम ने पाया कि दीमक और चींटियाँ शुष्क जलवायु में गेहूं की फसल की पैदावार बढ़ाने में मदद कर सकती हैं। उन्होंने दीमक युक्त खेतों और कीड़ों को बाहर करने के लिए उपचारित खेतों के बीच मिट्टी में खनिज सामग्री और जल अवशोषण को देखा।
परिणामों से पता चला कि दीमक और चींटियों वाले खेतों में गेहूं की पैदावार 36 प्रतिशत अधिक थी। कीड़ों द्वारा खोदी गई सुरंगों ने बारिश को जमीन में गहराई तक गिरने दिया, जिससे उपचारित खेतों की तुलना में तीन गुना अधिक नमी बरकरार रही।
खेतों में चींटी और दीमक की गतिविधि का दूसरा लाभ मिट्टी की नाइट्रोजन सामग्री है। दीमक के आंत बैक्टीरिया में नाइट्रोजन का उच्च स्तर होता है। शोध के उपलब्ध परिणामों के आंकड़ों के अनुसार, ये कीड़े अपनी सुरंगें कैसे खोदते हैं, इसकी प्रकृति के कारण नाइट्रोजन मिट्टी में स्थानांतरित हो जाती है। भारत में पारंपरिक किसानों और जैविक खेती करने वालों को इन देशों के अनुभवों के बारे में नहीं सिखाया गया है। हालाँकि श्री खके का कहना है कि उन्होंने किसानों को बताया कि दीमक और केंचुए उनके मित्र हैं। एक अकेले योद्धा के रूप में, उन्होंने लगभग 20 साल पहले, दीमकों के महत्व को प्रदर्शित करना शुरू किया था जो पेड़ों की सूखी छाल को चुपचाप खा जाते हैं।
हाल ही में, उन्होंने ठाणे जिले के शाहपुर में आदित्य एग्रो फार्म में 20 हेक्टेयर के भूखंड पर दीमकों के लाभकारी उपयोग पर प्रकाश डाला।जहां काजू, चीकू, काला जामुन, आंवला और सोनचाफा जैसी अन्य फसलों के अलावा काली कपास मिट्टी में 450 आम के पेड़ लगाए गए हैं। पूर्ण विकसित पेड़ों का एक पूरा भाग दीमकों से "संक्रमित" दिखाई दिया, जिससे श्री खके को भी सुखद आश्चर्य हुआ। हालाँकि, फार्म के मालिक और उनके कर्मचारी और श्रमिक श्री खके की बताई प्रक्रियाओं का पालन कर रहे हैं। इसलिए, जब भी दीमक पेड़ों के तनों और शाखाओं पर रेंगने लगते हैं तो उन्हें चिंता नहीं होती। फार्म मालिकों ने श्री खके की टिप्पणी को समझा कि दीमक केवल मृत लकड़ी को खाते हैं और इस प्रक्रिया में, पेड़ों की छाल को हटा देते हैं जिसके परिणामस्वरूप सफेद ताजा दिखने वाली नई छाल निकलती है। इससे यह निर्णायक रूप से समझ आया कि पेड़ मरे नहीं थे। इसके विपरीत, ये और भी बड़े हो जाते हैं। अधिक दीमकों को आकर्षित करने के लिए, श्री खके ने आदित्य एग्रो फार्म के कर्मचारियों से इस वास्तविक 'दावत' में अधिक दीमकों को आकर्षित करने के लिए पेड़ की छंटाई से उत्पन्न सूखी शाखाओं को खेत में विभिन्न स्थानों पर रखने के लिए भी कहा, जो कि अच्छे के लिए काम करता प्रतीत होता है। एक कदम आगे बढ़ते हुए, उन्होंने एक श्रेडर के माध्यम से काटी गई लकड़ी की तुलना में काटी गई सूखी लकड़ी के माध्यम से दीमकों को आकर्षित करने की प्रभावकारिता का तुलनात्मक विश्लेषण करने का भी सुझाव दिया है, जो कि बेहतर और सुरक्षित मल्चिंग सामग्री है।
महाराष्ट्र के विदर्भ क्षेत्र के मेलघाट में श्री खके ने आदिवासियों को खेत की मिट्टी पर सूखी पत्तियां, शाखाएं और खरपतवार फैलाने के लिए प्रशिक्षित किया। जिससे इस तरह की गीली घास से नमी बनी रहे। श्री खके ने आदिवासियों को दिखाया कि कैसे गीली घास से मिट्टी के नीचे नमी का संरक्षण होता है और झाड़ियों, पौधों और पेड़ों को बढ़ने में मदद मिलती है।
विभिन्न प्रकार के कीड़े-मकौड़ों की तरह, दीमक भी इस नमी को पसंद करते हैं। श्री खके किसानों को समझाते हैं कि नम वातावरण दीमकों को पतली सुरंगें खोदकर और भोजन (अर्थात् उनकी लकड़ी) की तलाश करके क्षेत्र का पता लगाने के लिए प्रोत्साहित करता है। एक और जगह सूखे पत्तों, पेड़ की शाखाओं और लकड़ियों से ढकी हुई है। यह मिट्टी की सतह को ढकने के लिए गीली घास है, जो उर्वरता और मिट्टी के स्वास्थ्य में सुधार के लिए मिट्टी की नमी को संरक्षित करने के लिए फायदेमंद है।
खके ने किसानों को यह भी बताया है कि छाल के चिप्स मल्चिंग के लिए बहुत उपयोगी होते हैं। दीमकों की गतिविधि से उत्पन्न मिट्टी बहुत नरम और उच्च गुणवत्ता वाली और खेती के लिए अच्छी होती है। चींटियों या दीमकों द्वारा बनाए गए मिट्टी के ढेर उच्च गुणवत्ता के होते है, और खेती में खाद के रूप में उपयोगी होते है । खके महाराष्ट्र में इस क्षेत्र के दौरे के दौरान किसानों को सलाह दे रहे हैं।
उनके एक अनुयायी ने उनके मार्गदर्शन में वीडियो कहानियां बनाने में उनकी मदद करना शुरू कर दिया है। इससे पता चलता है कि एक जीवित केले के पौधे का तना भी दीमक से भरे स्थान पर बहुत अच्छी तरह से विकसित होता है। उनका कहना है कि पौधा आगे बढ़ता है और मरता नहीं है। उन्होंने इस अंधविश्वास को मिटाने की कोशिश की है कि चींटियों की पहाड़ी या दीमक की पहाड़ियाँ कोबरा और अन्य सरीसृपों का निवास स्थान हैं।
उन्होंने बताया कि दीमक सुरंगें बनाते हैं जो पौधों को भूजल तक अधिक आसानी से पहुंचने में सक्षम बनाती हैं। खराब मिट्टी की उर्वरता बड़े पैमाने पर फसल की पैदावार को कम कर देती है और पूरे क्षेत्र में भोजन की कमी में योगदान देती है। खके मानते हैं कि दीमक दुनिया भर में पाए जाते हैं और प्रजाति और स्थान के आधार पर फायदेमंद या हानिकारक हो सकते हैं। वे घरों, बाड़ों और अन्य इमारतों के संरचनात्मक पतन का कारण बनते हैं। यदि इससे इतना नुकसान हो रहा है तो कीट नियंत्रण के उपाय अवश्य करने चाहिए। लेकिन प्रकृति में, दीमक मृत या सड़ी हुई लकड़ी को तोड़ने के लिए जिम्मेदार हैं और उनके साथ किसान मित्र के रूप में सम्मानपूर्वक व्यवहार किया जाना चाहिए।
drkirnthakur@gmail.com
Some new links for references:

Tuesday, 9 April 2024

“किरण ठाकूर” आणि “किरण ठाकुर”



मी किरण ठाकूर मूळ जळगाव जिल्ह्यातला. ते किरण ठाकुर  बेळगावचे.  

दोघांचेही मूळ पत्रकारितेतले.  दोघांचीही श्रद्धा लोकमान्य टिळक यांच्या पायाशी. दोघांचेही आदर्श पत्रकारितेतील,  दैनिक सकाळचे डॉक्टर नानासाहेब  परुळेकर. काल परवा पर्यंत फक्त माझ्याच नावा आधी “डॉक्टर” लिहिले जायचे.  ते “श्री” किरण ठाकुर होते. आता त्यांच्या देखील नावापूर्वी डॉक्टर ही उपाधी सन्मानाने लावली जाणार आहे. 

पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने सहा एप्रिल २०२४ रोजी त्यांच्या   कर्तबगारीचा सन्मान एका भावपूर्ण पदवीदान समारंभात   डी लिट ही सन्माननीय पदवी देऊन केला, आता आम्ही दोघेही डॉ किरण ठाकूर आहोत. पण हे साम्य आणि ही गमतीची तुलना येथेच संपते. वर्तमानपत्रात आमच्या दोघांच्या नावाचा उल्लेख झाला तर वाचकांचा गोंधळ यापुढे होतच राहणार आहे. आमच्या नावाची ही गोष्ट लिहिण्याची बहुदा हीच योग्य वेळ आहे. त्यातील माझी गोष्ट थोडक्यात आटोपता येईल अशीआहे.  त्यामुळे ती आधी सांगतो. 

माझे नाव शाळा कॉलेज च्या रेकॉर्ड मध्ये “किरणचंद्र कन्हैयालाल ठाकूर.” जन्म १३ मार्च १९४७ रोजी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथला.  वडील महसूल खात्यात नोकरी करणारे, मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या चारही भाषांवर  प्रभुत्व असणारे. पत्रकारितेचे औपचारिक शिक्षण घेऊन मी पत्रकार झालो. माझी पत्रकारिता नानासाहेब   परुळेकर यांच्या मराठी दैनिक सकाळ मध्ये १९६९-७० मध्ये सुरु झाली.  नंतर ती युनायटेड न्यूज ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तसंस्थेत झाली. अगदी तटस्थपणे दोन्ही बाजू सांगणारे वार्तांकन करणे, आपली स्वतःची मते लिखाणात चुकून सुद्धा येणार नाहीत याची दक्षता मी आयुष्यभर घेतली. पुढे वृत्तपत्रविद्या विभागाचा शिक्षक झालो तेव्हा माझ्या विद्यार्थ्यांना देखील हेच धडे मी दिले. इंग्रजी वर्तमान पत्रांसाठी थोडक्यात आणि सोपे कसे लिहावे हे शिकवले.  ऑनलाइन जर्नलिजम मधली भारतातील पहिली पीएचडी मला मिळाली. अर्धा डझन पुस्तके पत्रकारितेवर लिहिली.  संत ज्ञानेश्वर आणि वारकरी संप्रदाय हे माझ्या अभ्यासाचे विषय हल्ली झाले आहेत.  सेंद्रिय शेती हा माझ्या औत्सुक्याचा विषय आहे.  त्यासंबंधी जमेल तेव्हा मराठी आणि इंग्रजी मध्ये लिहिण्याचा प्रयत्न मी करतो. येथे माझी कहाणी संपते. 


दुसऱ्या “किरण ठाकुर” यांची कहाणी मात्र विस्तृत असणे आवश्यक आहे. बेळगावच्या “किरण बाबुराव ठाकुर” यांचा  जन्म ७.४. १९५२ चा. स्वातंत्र्यपूर्व काळातील महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आदींच्या चळवळीतील पार्श्वभूमी असलेल्या बाबुराव ठाकूर यांचे ते सुपुत्र. 

बाबुराव यांनी साप्ताहिक, मासिक  आणि दैनिक तरुण भारत अशी पत्रकारिता केली. स्वातंत्र्य आंदोलन आणि सीमा  भागातील प्रश्न हेच त्यांच्या पत्रकारितेचे मुख्य विषय होते. तरुण भारत या नावाचे मराठी भाषेत नागपूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी दुसरे दैनिक आहे. “तरुण भारत, बेळगाव” चा  वेगळा  दबदबा निर्माण झाला. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या भागात सामाजिक, राजकीय विषयावर बातम्या आणि दिशा देणारे लढाऊ दैनिक अशी त्याची प्रतिमा निर्माण झाली.   या दैनिकाचे सल्लागार संपादक श्री किरण ठाकुर हे त्यांच्या कार्यक्षेत्राचा एक भाग. 


सन्मानीय डी लिट पदवी धारक डॉ.  किरण ठाकुर 

त्यांच्या विस्तारीत कार्याविषयी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ दीपक टिळक आणि कुलगुरू टिळक यांच्या नेतृत्ताखालील विद्वान मंडळींनी परीक्षण करून सन्मानीय डी लिट पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्या मानपत्राच्या संपादित मजकुरावरून   डॉ.  किरण ठाकुर यांच्या विस्तृत कर्तबगारीविषयी थोडक्यात कल्पना येऊ शकते:

सहकार, पत्रकारिता, शिक्षण  या समाज घडणीतील महत्त्वाच्या क्षेत्रांवर डॉ किरण ठाकुर यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. स्वातंत्र्य चळवळीस अनेक चळवळीमध्ये अग्रभागी राहिलेल्या आणि सामाजिक प्रगतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या आपल्या आई-वडिलांचा - बाबूराव ठाकूर आणि माई ठाकूर यांचा उज्ज्वल वारसा ते समर्थपणे पुढे नेत आहेत. 

महाराष्ट्रातील सहकार चळवळ आणि सहकार क्षेत्रातील खंद्या नेत्यांपासून प्रेरणा घेत १९९५ मध्ये त्यांनी बेळगाव या आपल्या कर्मभूमीत लोकमान्य सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. लघु आणि नव उद्योजकांना आर्थिक पाठबळ देऊन लोकमान्य सहकारी पतसंस्था बेळगाव आणि परिसरातील अर्थकारणाला वेगवान गती मिळवून दिली. आपल्या कुशल नेतृत्वाखाली या पतसंस्थेने गुणवत्तापूर्ण प्रगतीची आणि विस्ताराची नवी  क्षितिजे पादाक्रांत करीत देशातील प्रथम क्रमांकाची आंतरराज्यीय सहकारी पतसंस्था, हे स्थान मिळविले.


सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून त्यांनी सुरू केलेले 'लोककल्प फाउंडेशन' असंख्य कुटुंबांना त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यात मदत करीत आहे. कर्नाटक-गोवा सीमेवर अनेक गावे दत्तक घेऊन 'लोककल्प फाउंडेशन'ने समृद्धीची दिशा दिली. संधीपासून जे वंचित आहेत, मात्र स्वप्नपूर्तीसाठी कष्टाची तयारी आहे अशा सर्वांच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. आरोग्यशिबिर, क्रीडास्पर्धा यांसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, सर्वसामान्यांच्या प्रगतीला पाठबळ देत त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी ते  अथक प्रयत्न करीत असतात.  

बाबूराव ठाकूर यांनी स्थापन केलेल्या तरुण भारत, बेळगाव या वृत्तपत्राला त्यांनी सर्वदूर पोहोचवून वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून दिले आहे. अवध्या २७ व्या वर्षी डॉ किरण ठाकुर यांच्या खांद्यावर  'तरुण भारत, बेळगाव ' च्या संपादकपदाची धुरा आली. आज कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांतून 'तरुण भारत' प्रकाशित होत असून, आपल्या आठ आवृत्तींद्वारे या वृत्तपत्राने पत्रकारिता क्षेत्रात दबदबा निर्माण केला आहे. अन्यायाविरुद्ध सतत आवाज उठवत तसेच सत्य आणि पारदर्शकतेचा आग्रह धरीत आपल्या वृत्तपत्राने शताब्दीचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला. इंडियन न्यूजपेपर सोसायटी, ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्युलेशन या केंद्रीय पातळीवरील सर्वोच संस्थांचे ते  सन्माननीय सदस्य म्हणून ते काम करीत आहेत. 

बेळगावमधील दक्षिण कोकण शिक्षण संस्था, बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समिती, बेळगावमधील ज्ञान प्रबोधन मंदिर शाळा यांसह विविध शिक्षण संस्थांशी ते निगडित आहेत. या संस्थांद्वारे नव्या पिढीची जडणघडण आणि शिक्षण प्रसाराचे मोलाचे कार्य होत आहे.

रावसाहेब गोगटे पुरस्कार, बिझनेस गोवा अवॉर्ड, जागतिक मराठा चेंबर ऑफ कॉमर्स उद्योजकता पुरस्कार, शं. न्या. किर्लोस्कर ट्रस्ट पुरस्कार, पत्रकारितेतील कार्यासाठी डॉ. ना. भि. परुळेकर पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, महर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार, कोकण भूषण पुरस्कार, बेळगावच्या सरस्वती वाचनालयाचा बेळगाव भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. 

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सहा एप्रिल २०२४ रोजीच्या चाळिसाव्या पदवीदान समारंभात डॉ किरण ठाकुर यांच्या समवेत आणखी दोन दिग्गजांना सन्मानीय डी लिट पदवीने गौरविण्यात आले. डॉ नौशाद फोर्ब्स आणि भारत विकास ग्रुप चे श्री हणमंतराव गायकवाड अशा त्या अन्य उत्सवमूर्ती होत. कुलपती डॉ दीपक टिळक,कुलगुरू डॉ गीताlली टिळक यांनी या सन्मान डी लिट पदव्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या चाळिसाव्या पदवीदान समारंभात प्रदान केल्या. 

***


या नामसाधर्म्य असणाऱ्या किरण ठाकूर आणि किरण ठाकुर यांनी आयुष्यात अनेक वेळा  गमतीशीर अनुभाव  देखील घेतले. त्यावर मी एकदा थोडे लिहिले होते. त्याचा छोटासा भाग या निमित्त्याने पुनः  एकदा लिहावासा वाटतो::

किरणचंद्र कन्हैयालाल ठाकूर हे माझे शाळेतले नाव. पत्रकारितेच्या अभ्यासासाठी पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूट बिल्डिंग मध्ये १९६९-७० मध्ये प्रवेश केला तेव्हा लेखनासाठी लेखक म्हणून वेगळे नाव नव्हते. मी विजय तेंडुलकर यांचा फॅन होतो. त्यांची नाटके आणि वृत्तपत्रीय लेख खूप आवडायचे. विशेषतः साप्ताहिक माणूस  मधील लेख तेव्हा खूप गाजायचे. फॅन म्हणून त्यांना काही पत्र देखील मी लिहिली होती. त्यांचे सुंदर हिरव्या शाईत लिहिलेली एक- दोन पत्रे मला आली होती. ती अजूनही मी जपून ठेवली आहेत. 

तेव्हा ते लोकसत्ता मध्ये  सहायक संपादक होते.  रविवारच्या पुरवणीसाठी मी एक लेख लिहिला आणि धाडस करून त्यांच्याकडे पाठवला.  त्यावेळी सुद्धा माझे हेच पूर्ण नाव दिले होते.  आठ-पंधरा दिवसात तो छापून आला.  तेंडुलकरांनी त्याचे संपादन केले असे मला उगीचच वाटलं.  त्यांनी लेखकाचे म्हणजे माझे नाव बदलून  छोटे सहा अक्षरी “किरण ठाकूर” असे छापले. त्या लेखाच्या शीर्षकात तेरा शब्दांचा मोठा मधळा बसला नाही, म्हणून सहा अक्षरात बसवला. माझ्या नामांतरा चे श्रेय अशा त-हेने विजय तेंडुलकर यांना जाते. 

पण या बदलामुळे पुढे आयुष्यात खूप गमती जमती तेव्हा घडल्या.  अजूनही माझ्या वयाच्या अठ्ठ्यातराव्या वर्षी घडत आहेत.त्याची ही गोष्ट;


शेक्सपियर ने नावात काय आहे असे म्हणून ठेवले असले तरी नावात खूप गमती जमती करण्याची क्षमता आहे. ती कशी त्याची पार्श्वभूमी आधी. 

विजय तेंडुलकरांमुळे लोकसत्तेत मी किरण ठाकूर नावाने लेख लिहिला. त्यानंतर माणूस, वाङ्मयशोभा,  मनोहर, अमृत, सकाळ अशा ठिकाणी हेच नाव कायम राहिले. वडिलांना खूप कौतुक वाटायचे.  त्यावेळी ते नाशिकला राहत असत.  शहरभर आपल्या सर्व मित्रांना तो अंक दाखवायला ते घेऊन जायचे. लेखावर ‘त्याचे नाव ‘किरण ठाकूर’ असले, पण तरी तो माझाच मुलगा  “किरणचंद्र कन्हैयालाल ठाकूर” आहे बर का असे मित्रांना गमतीने सांगायचे. तेव्हा किरण ठाकूर नावाची दुसरी कुठली व्यक्ती असेल असे माझ्या ध्यानीमनी देखील नव्हते.
पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर पहिली इंग्रजी वृत्तसंस्थे मधली नोकरी करण्यासाठी दिल्लीला गेलो. काही महिन्यातच राजधानीतील मराठी पत्रकारांच्या ओळखी झाल्या. महाराष्ट्रातील महत्त्वाची मंडळी दिल्लीत आली की पत्रकारांना निरोप जायचे.  मग सगळ्यांनी एकत्रित भेटायचं अशी प्रथा होती. काही वेळा बातमीचा विषय असेल तर त्यासाठी भेटीगाठी घ्यायच्या असा उपक्रम सुरू असायचा.
एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते बाबुराव ठाकुर आपल्या काही कामासाठी आले होते हे कळल्यावर त्यांना भेटायला त्यांच्या हॉटेलवर मी गेलो. इंटरकॉम फोनवर निरोप दिला किरण ठाकुर  म्हणून नाव सांगितलं.  ते अत्यंत त्वरेने बाहेर आले. कुठे आहे किरण म्हणून शोधू लागले. मी तर समोरच होतोच . मग  मी स्वतःची ओळख दिली. तेव्हा त्यांचा हिरमोड झाला.  त्यांना अपेक्षा होती त्यांचा सुपुत्र किरण बेळगावहुन अचानक दिल्लीत आला आहे.  घरी न सांगता हा कसा आला याची ती काळजी होती.  हा तर दुसराच कोणी किरण ठाकूर त्याची त्यांना सुद्दा  गंमत वाटली. आमच्या गप्पा झाल्या. चहापान झाले, निरोप घेतला. 

येथून नाम साधर्म्याच्या च्या गमतीजमती सुरु झाल्या. बेळगावच्या किरणच्या आडनावात “कु” हृस्व तर माझा दीर्घ “कू ” एव्हडाच काय तो फरक.

बाबुरावजी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते होते तसे बेळगाव च्या तरुण भारत या वृत्तपत्राचे मालक संपादक होते.  महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर त्यावेळी सतत आंदोलने होत असत.  त्यात आधी ते आणि नंतर किरण नेतृत्व करायचे. मुंबई विधानसभेत येऊन आंदोलन केल्यामुळे किरण ला अटक व्हायची. त्याच्या बातम्या मुंबईच्या दैनिकात ठळकपणे यायच्या.  हेडलाईन मध्ये देखील “किरण ठाकुर यांना अटक” असं प्रसिद्ध व्हायचं माझ्या नातेवाईकांना चिंता वाटायची. भेट झाली तेव्हा मला खडसावून विचारायचे .  तुला काय गरज आहे या गोष्टी साठी आंदोलन करायची? “विषय बेळगावचा, आपण जळगावचे.  काही अर्थाअर्थी आपला संबंध नसताना तू कशाला या आंदोलनात अटक करून घेतो” अशी त्यांची विचारणा असायची.

माझं लग्न झाल्यावर पुण्याच्या लक्ष्मीनगर मध्ये चाळीतील एका घरात राहू लागलो.  “ज्येष्ठ पत्रकार बाबुराव ठाकुर यांचे निधन झाले” ही बातमी पुण्याच्या अनेक दैनिकात प्रसिद्ध झाली. ती वाचून आमचे शेजारी समाचाराला आले. शोकाकुल वातावरण दिसेना.  शेवटी एकीने धाडस करून विचारलं की सासरे देवाघरी गेले तरी तुझ्या डोळ्याला आसवाचा एकही थेंब नाही, असे कसे?

काही वर्षांनी बेळगावच्या किरण ठाकुर चे लग्न ठरल्याची पत्रिका पुण्यात काही ठिकाणी आली. ती पाहून माझ्या दोन तीन  मित्रांनी माझ्या पत्नीला छेडले च. तुझा नवरा दुसरे लग्न करायला निघाला आहे आणि तू अशी डोळ्यावर पट्टी बांधल्या सारखी स्वस्थ कशी बसली आहेस!  त्यांनी सोबत त्या पत्रिकेचा एक नमुना आणला होता. पण तोपर्यंत या गमतीजमती दोन-चार वेळा होऊन गेल्या होत्या त्यामुळे तिला फार काळजी वाटण्याचे   कारण नव्हते. 

मराठी लोकांचे मुखपत्र म्हणून तरुण भारत खूप प्रभावीपणे काम करत असतो.  पण त्याचा प्रभाव कर्नाटकामधील बेळगाव परिसरात मर्यादित होता, ते देखील मराठी भाषकांसाठी.  महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका  कर्नाटक राज्यात  प्रभावीपणे मांडण्यासाठी आपण इंग्रजी देखील दैनिक काढावे, असे मालक संपादक  किरण ठाकुर यांच्या मनात आले.  एकदा ते  पुण्यात आले तेव्हा त्यांनी मला ऑफर दिली: या  इंग्रजी वर्तमानपत्राचा संपादक म्हणून मी काम करावे.तशी ऑफर आकर्षक होती. पण पुणे सोडून बेळगावी येणे शक्य नव्हते. त्यामुळे मी नाही म्हटले. मग त्यांनी मिश्किलपणे हे देखील सांगून टाकले की मला इंग्रजी चा संपादक नेमण्यामागे  त्यांचा एक वेगळा हेतू होता. आपल्या  एकीकरण समितीच्या कामामुळे अटक करायला बेळगावचे पोलीस आले आणि किरण ठाकूर कोणते हे विचारलं तर स्टाफ च्या  लोकांनी माझ्याकडे बोट दाखवायचे आणि मला उचलून तुरुंगात टाकले तरी  बेळगाव चे किरण ठाकुर आपले संपादकीय काम  चालूच ठेवू शकतील!

त्या किरण ठाकुर यांनी नी सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक , क्षेत्रात भरीव काम केले आहेच. आता लोकमान्य मल्टि पर्पज सोसायटी चे १९९५ पासून काम सुरू केले. फार मोठा पसारा होतो आहे आणि सारखा विस्तार होत आहे. बातम्या, जाहिराती, आणि सामाजिक कार्यातील सहभाग यामुळे त्याच्या नावाची प्रसिद्दी नेहमी होते. तेव्हा नाम साधर्म्य चे याचे आणखी  वेगळे अनुभव यायला लागले. माझा फोन नंबर शोधून माझ्याशी या पतपेढी संबंधीची कामे सांगायला काही लोक बोलायला लागले आहेत. त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संबंधीच्या तक्रारी मला ऐकवू लागले.  कर्जासंबंधीची गळ घालण्यासाठी रात्री उशिरापर्यंत केव्हाही फोन येऊ लागले.  आता हे प्रकार खूप कमी झाले आले आहेत .  केव्हातरी एखाद दोन प्रसंग येतात. पण अगदी अलीकडे  आणखी वेगळाच अनुभव आला.  मी लोकमान्य चा  किरण ठाकुर असे गृहीत धरून पुण्यातील एका महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी साठी मी अध्यक्षस्थानी यावे (आणि उपक्रमासाठी साठी देणगी द्यावी) असा प्रस्ताव देणारा तो फोन होता!!

---




Wednesday, 22 November 2023

National Conference on ‘Media at the Crossroads: Balancing Human and Artificial Intelligence’ scheduled on Ja

Abstracts invited for TMV-JMC National Conference 2024 titled ‘Media at the Crossroads: Balancing Human and Artificial Intelligence’ scheduled on Jan 8 and 9, 2024.

Every new invention in communication technology sparks engaging discussions and fierce debates about how they will impact the media. Commonplace uses of artificial intelligence and data-driven content strategies have become the order of the day. They need close scrutiny to fully comprehend how earlier practices that depended largely on human intelligence will be affected by the new technologies. The impact will be felt not only in the process of content creation but also in media business, personnel management and media education. The use of AI will also have to be studied from the audience's perspective.

However, at present the discussion about the impact of AI may be somewhat speculative in nature, as it is an evolving process and the results have not fully presented themselves.  Therefore, a scrutiny of contemporary media (of the pre-AI era) also is of significant academic interest. Research that documents the current practices will be of great value for comparative studies in the future.

TMC-JMC National Conference 2024 will provide the perfect platform to industry professionals, media educators and researchers to share their observations and insights.

 With the aim to balance the past, present and future media activities the conference will feature experts who will explore the central theme of the conference ‘Media at the Crossroads: Balancing Human and Artificial Intelligence’ from several angles.

Media educators and researchers will get the opportunity to present their research before peers and engage in stimulating academic dialogue.

Abstracts are invited for the topics below (but not restricted to them)

Artificial Intelligence: technology and its usage in media; comparison with human-generated content; potential and risks; impact on manpower; cause of a new divide?

Journalism:  emergence of data journalism; data-driven content creation; tackling fake news

Entertainment: post-COVID trends; OTT vs traditional cinema; trends in sports coverage; gaming and AI

Advertising: consumer-targeting through data analytics; influencer marketing; customisation; use of VR and AR in advertising

Media for development: application of technology for development communication; use of data;

Social media: the ‘X’ factor; fake identities and BOTs

Language: using machine translation tools; influence on language

Note: Studies pertaining to Indian language media and understudied audiences are especially encouraged.

Important dates:

Submission of abstract: Nov. 25, 2023

Notification of acceptance: Dec. 8, 2023

Submission of full paper: Dec. 31, 2023

Conference dates: Monday, Jan 8 and Tuesday, Jan. 9, 2024

at Tilak Maharashtra Vidyapeeth, Mukund Nagar, Pune.

Details of registration can be found in the poster and brochure attached.

 further queries, write to me or call Kimaya Mehata (9637112133).

Regards,

Prof. Dr. Ujjwala Barve

Dean, Tilak Maharashtra Vidyapeeth

Pune

ujjwalabarve@gmail.com  

Monday, 20 November 2023

"अतिशय सोप्या, रंजक पद्धतीने लिहिलेले पुस्तक"

“पॉडकास्टिंग हे एक असे माध्यम आहे ज्यात तुम्ही लोकानुनयाचा  विचार न करता आपल्या आवडीचा विषय घेऊन त्याबद्दलचे पॉडकास्ट करू शकता आणि घवघवीत यश संपादन करू शकता. 

ते कसं करू शकता, त्यासाठी काय तयारी हवी,  कोणती  उपकरणं गरजेची आहेत या सगळ्याची उत्तरं तुम्हाला या पुस्तकात मिळतील, या पुस्तकाची मला सगळ्यात भावलेली  गोष्ट म्हणजे ते अतिशय सोप्या आणि रंजक पद्धतीने लिहिले आहे. भाषा सोपी वापरली की आपोआपच 'हे मला  जमेल' असा आत्मविश्वास वाटतो. काही अतिशय  व्यावहारिक सूचनाही या पुस्तकात दिलेल्या आहेत. हे माध्यम समजलं आहे. अशा अनुभवी लेखकांनी हे पुस्तक लिहिलं  आहे, ही या पुस्तकाची आणखी जमेची बाजू आहे. उज्बला बर्वे  आणि नचिकेत क्षिरे या दोघांनी 'माध्यम संशोधन संवाद  आणि 'इन्स्पिरेशन कट्टा' सारख्या यशस्वी पॉडकास्टची निर्मिती  केली आहे.”

कौशल इनामदार 


Friday, 15 September 2023

The Changing Mediascape: Boook By BRP Bhaska

https://docs.google.com/document/d/1kq8FcMbsSi-EXpOSEkXEqtyBzJT405hVnFPKwMgN9LI/edit?usp=sharing